जिवंत सातबारा मोहीम
महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार आपल्या राज्यात Jivant Satbara Mohim राबविली जाणार आहे.आज आपण Jivant Satbara Mohim | जिवंत सातबारा मोहीम बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Jivant 7/12 Mohim :-
- सातबारा वरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रकिया पूर्ण करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- आपल्या राज्यातील बुलढाणा जिल्हात सर्वप्रथम याची सुरुवात झाली.
- दिनांक 1 एप्रिल 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात Jivant Satbara Mohim | जिवंत सातबारा मोहीम राबविली जाणार आहे.
- या संबधीत अधिक माहितीसाठी आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.

वारसा संबधित आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :-
- मृत्यू दाखला
- वारसाबाबत स्वयं घोषणापत्र/सत्य प्रतिज्ञालेख
- सरपंच/ पोलिस पाटील/ ग्रामसेवक यांचा दाखला
- सर्व वारसाचे नावे, वय, पत्ते, संपर्क क्रमांक
- रहिवासी पुरावा
विशेष बाबी :-
- 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान गावचे ग्राम महसूल अधिकारी चावडी वाचन करून न्यावप्रविष्ठ प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यादी तयार करतील.
- 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान वारस नोंदी लावण्याचे काम होईल.
- 21 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 दरम्यान ई फेरफार प्रणालीमध्ये वारसा फेरफार होईल. असा कृती आराखडा शासनाने ठरवून दिला आहे.
- ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांना भेटावे.
सातबारा आणि आठ अ उतारा म्हणजे शेतकरी बांधवाचे सर्वात परिचयाचे सरकारी कागदपत्रे.
7/12 विषयी :-
- सातबारा उताऱ्यावरून आपल्याला जमीनीची मालकी कुणाकडे आहे. हे समजते.
- जमिनीवर कर्ज आहे का ? असेल तर किती आहे ? एकूण क्षेत्र, पिक पाहणी म्हणजे जमिनीवर किती क्षेत्रावर कोणते पिक लावले याची प्राथमिक माहिती समजते.
- जलसिंचन साधन, कुळाचे हक्क, इतर हक्क, खाते नंबर, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी सर्व बाबीची माहिती कळते.
विशेष माहिती –
- दर 10 वर्षांनी 7/12 नोंद नव्याने लिहिली जाते.
- पिक पाहणी नोंद दरवर्षी करणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे योजना, अनुदान, विमा, शासकीय नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.
- कोणतीही फेरफार नोंद झाल्यास लगेच ती 7/12 वर अपडेट करून घ्यावी.
- 7/12 उतारा नेहमी काळजीपुर्वक वाचावा. त्यात काही चूक असल्यास लगेच आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी करावी.
१५ ऑगस्ट २०२१ पासून ७/१२ तील झालेले नवीन बदल खाली दिले आहे.
- सातबारा आणि आठ अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासन आणि ई महाभुमी प्रकल्पाचा लोगो असणार आहे.
- गावाच्या नावाबरोबर आता गावाचा कोड ( एल डी जी कोड ) सुद्धा असणार आहे.
- LDG Code – Local Government Directoryलागवडी योग्य क्षेत्र मोजमाप एकक हेक्टर आर चौरस मीटर असणार आहे.
- लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र वेगवेगळे दाखविले जाईल. आणि दोन्ही क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्र म्हणून नमूद असेल.
- बिनशेतीचे जमिनीचे मोजमाप एकक आर चौरस मीटर राहणार आहे.यात पोट खराब क्षेत्र, विशेष आणि जुडी आकारणी, इतर हक्कातील कुळ व खंड हे रकाणे वगळले आहे.
- बिनशेतीच्या सातबाऱ्यात सर्वात शेवटी ” सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने याकरिता गाव नमुना नंबर १२ ची गरज नाही. ” असा स्पष्ट उल्लेख असेल.
- दोन खातेदाराच्या नावात स्पष्टपणे दिसेल अशी रेषा असणार. ज्यामुळे पाहता क्षणी दोन खातेदार आहे हे लक्षात येईल.
- खाते क्रमांक खातेदाराच्या नावासमोर दर्शविला जाणार आहे.
- प्रलंबित फेरफार ही इतर हक्क रकान्यात नमूद करण्यात आली आहे.
- जुने फेरफार नोंदी आता स्वतंत्र व नवीन रकान्यात लिहिण्यात आल्या आहेत. या रकान्याचे नाव ‘ जुने फेरफार क्रमांक ‘ असे आहे.
- मयत खातेदार, ई करार नोंदी, कर्ज बोझ इत्यादी नोंदी भोवती कंस करून त्यावर आडवी रेषा मारण्यात आली आहे.
- शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची दिनांक आता इतर हक्क रकान्यात नमूद आहे.
आठ अ उतारा म्हणजे काय ?
- आठ अ उतारा मध्ये जमिनीवर किती कर आकाराला जातो.
- एकाच गावात एका व्यक्तीची किती जमीन आहे याबद्दल सविस्तर माहिती असते.
- 8 अ उतारा आपल्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो.
- शासकीय योजना, अनुदान किंवा कर्ज इत्यादी बाबीसाठी शेतकरी बांधवांकडे 8 अ उतारा असणे गरजेचे असते.
Team Krushi Rashtra