Fertilizer

पिकांना वाढीसाठी खताची Fertilizer नितांत आवश्यकता असते. पिकाची निरोगी वाढ आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व्हावे म्हणून आपण सगळे शेतीत खते Fertilizer टाकतो. आज आपण खते आणि खताचे प्रकार याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

खत | Fertilizer म्हणजे नेमके काय ?

  • खत म्हणजे पीक वाढीसाठी आवश्यक अन्न घटक पुरविणारे मिश्रण.
  • खत हे प्रामुख्याने दोन प्रकारची असतात.
  • सेंद्रिय खत | Organic Fertilizer
  • रासायनीक खत | Chemical Fertilizer

सेंद्रिय खत | Organic Fertilizer :

  • वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेष पासून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खताला सेंद्रिय खत म्हणतात.
  • सेंद्रिय खताचे प्रमुख प्रकार खालील प्रमाणे भरखते आणि जोरखते
  1. भर खते
  • भर खतात आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने याचे प्रमाण कमी असते.
  • ही खते पिकांना सावकाश लागू होतात.
  • यामध्ये कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खते, लेंडी खते यांचा समवेश होतो.
  • रासायनिक खताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.
  • ही खते जमिनीची घडण सुधारते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • याच्या वापराने जमिनीचे आरोग्य सुधारते.

2. जोर खते :

  • जोर खतात अन्नद्रव्यांचे प्रमाण भर खतापेक्षा तुलनेने जास्त असते.
  • ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात.
  • यामध्ये करंज पेंड, नीम पेंड, हाडाचा चुरा, मासळीचे खत इत्यादी बाबी येतात.

रासायनीक खत | Chemical Fertilizer

  • रासायनिक खते ही कारखान्यात योग्य प्रकारे प्रक्रिया करून विशिष्ट ग्रेड मध्ये तयार केली जातात.
  • उदाहरण. 10-26-26, 18-46-00, 15-15-15 इत्यादी.
  • रासायनिक खते प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश, गंधक ही अन्नद्रव्ये पुरवितात.
  • या खताची सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड पिकांना सर्व मायक्रो नुट्रीयंट उपलब्ध करून देतात.
  • रासायनिक खतांचे खालील प्रकार पडतात.
  • नत्रयुक्त
  • स्फुरद युक्त
  • पालाश युक्त
  • मिश्र खत
  • संयुक्त खते
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये
  • विद्राव्य खते

रासायनिक खते पिकांना देताना खालील प्रमाणे द्यावे.

  • नत्रयुक्त खते म्हणजे युरिया एकदाच न देता दोन ते तीन टप्प्यात द्यावा.
  • खत Fertilizer देताना पिकाभोवती बांगडी पद्धतीने किंवा दोन रोपांच्या ओळीत द्यावे.
  • टाकलेले खत मातीआड करावे.
  • पेरणी यंत्र वापरताना बियाणे टाकताना खत सुद्धा पेरावे याचा खूप फायदा होतो.
  • खत ओलसर असल्यास कोरड्या मातीत मिक्स करून घ्यावे.

हे सुद्धा वाचा.

पिकांना अन्नद्रव्ये कमी पडल्यास काय परिणाम जाणवतो.

  • पिकाची वाढ जोमाने होत नाही.
  • पिकाचा शेंड्याची वाढ खुटंते.
  • फुटवा कमी होतो.
  • पानावर ताबडतोब अन्नद्रव्ये कमतरता दिसून येते.
  • परिणामी पीक उत्पादनात घट येते

पिकांना लागणारे अन्नद्रव्ये :

  • नायट्रोजन
  • फॉस्फरस
  • पोटॅशियम
  • कॅल्शियम
  • मॅग्नेशियम
  • गंधक
  • लोह
  • झिंक
  • बोरॉन
  • कॉपर
  • क्लोरीन
  • सिलिकॉन
  • मोलीब्देनम
  • मंगल
  • कोबाल्ट इत्यादी

आपल्या राज्यात खालील खताचे ग्रेड हे लोकप्रिय आहेत.

  • 10-26-26
  • 18-46-00
  • 15-15-15-09
  • 20-20-00-13
  • 12-32-16
  • युरिया
  • MOP
  • सिंगल सुपर फॉस्फेट

खते | Fertilizer पिकांना देण्याच्या पद्धती :-

  • प्रामुख्याने चार पद्धतीने पिकांना खते दिली जातात.
  • Broad Casting
  • Localised Placement
  • Placement Method
  • Fertigation

महत्त्वपूर्ण बाबी :

  • प्रत्येक पिकाची अन्नद्रव्ये गरज वेगवेगळी असते. त्याप्रमाणे पिकांना खते द्यावीत.
  • दोन ते तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करावे यामुळे आपल्या शेतात नेमके कश्याची कमतरता आहे हे कळते.
  • मोघम खते दिल्याने जमिनीचा पोत कमी होतो. तसेच उत्पादकता सुद्धा घटते.
  • बेसुमार रासायनिक खते वापरल्याने आज महाराष्ट्रातील बहुंताश जमीन नापीकतेकडे चालली आहे.

खताची निवड करताना आणि ते वापरताना खालील बाबीचा अवलंब करावा.

  • जास्त कालावधीच्या पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा. म्हणजे 15-15-15
  • स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे पाण्यात विरघळणारी खतांची निवड करावी. उदा. DAP, SSP
  • बीजप्रक्रिया करण्यासाठी जैविक खते वापरावी.
  • डाळवर्गीय व तेलबियांसाठी सल्फरयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. SSP, TSP, AMONIUM SULPHATE इत्यादी.
  • स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.
  • एसेटोबॅक्टर, PSB, KMB, ZINK Bacteria यांचा वापर करावा.

नायट्रोजन म्हणजे नत्र हा पिकाच्या जीवनातील मूलभूत घटक आहे.

हिरवळीची खते :

  • हा एक उत्तम आणि पर्यावरणपूरक प्रयोग आहे.
  • हिरवळीची खते म्हणून आपण शेवरी, ताग, धैंचा, चवळी इत्यादी पिके वापरावी.
  • ही पिके लागवड केल्यावर दीड ते दोन महिन्यांनी जमिनीत उभी गाडावी.
  • याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारण्यास खूप मदत होते.
  • अगदी कमी खर्चात जास्त परिणाम देणारी ही पद्धती आहे.
  • हिरवळीची खते वापरल्याने जमिनीला सेंद्रिय कर्ब, नायट्रोजन पुरविला जातो.
  • जमिनीची धूप कमी होते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • नायट्रोजन, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखी अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

विद्राव्य खते :

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक शेतकरी आज पिकांना खत व्यवस्थापन करतात.
  • ठिबक सिंचनाचा वापर करून Water Soluble Fertilizer पिकांना देणे म्हणजे Fertigation Method होय.
  • सध्या फळबाग, भाजीपाला, टरबूज, खरबूज अश्या पिकांना या पद्धतीने खते दिली जातात.

विद्राव्य खते वापरण्याचे फायदे :-

  • कमी खर्चात, कमी वेळेत खते दिली जातात.
  • मनुष्यबळ खूप कमी लागते.
  • खत हे मुळांच्या कार्यक्षेत्रात पडल्याने पिकांना ताबडतोब लागू होते.
  • खताची 25% पर्यंत बचत होते.
  • पिकाचा गरजेनुसार खते देवू शकतो.

Team Krushi Rashtra